खडसे मंत्रिमंडळात परतावेत अशी सगळ्यांचीच इच्छा – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळात परत याव अशी सगळ्यांचीच इच्छा असल्याचं खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केल आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी ही चर्चा निरर्थक असल्याचं म्हटल आहे. न्यूज १८ लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तर एकनाथ खडसेंची दिल्ली वारी ही निव्वळ चर्चा आहे, त्यात फार काही नाही असं म्हणत पंकजा यांनी खडसेंची पाठराखण देखील केली. तर परळी विधानसभा निवडणुकीत ज्याने जनतेचे काम केले तोच निवडून येईल अस म्हणत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे असा सरळ सामना परळीत होणार असल्याचे संकेत सुद्धा दिले.