Share

Winter Session 2022 | विधानपरिषदेत खडसेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी

Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

८३ कोटीचा भूखंड दोन कोटी रुपयांना देणं म्हणजे मंत्री पदाचा दुरुपयोग तत्कालीन नगर विकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला.

या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. झोपडपट्टी साठी राखीव भूखंड असताना असा हस्तक्षेप केल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारकडे केली.

रोहित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र-

त्याचवेळी हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा भिडेवाडा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यामुळेच आज महिला शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेल्या भिडेवाड्याची स्थिती चांगली नाही. बुधवार पेठेतील हा वाडा केव्हाही कोसळू शकतो आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा उघडली, जिथे स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला. विद्यार्थिंनी शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्या इमारतीची सद्यस्थिती दुर्दैवाने अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी पुन्हा गरीब मुलींसाठी शाळा सुरू करण्याची जनतेची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कोरोनामुळे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now