Share

Eknath Khadse | “प्रेयसीच्या आठवणी…”, पुन्हा गुवाहाटीला जाणाऱ्या मुख्यमंत्री अन् आमदारांवर एकनाथ खडसेंची कविता

Eknath Khadse | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपुर्वी गुवाहाटीला जावून ४० आमदारांसोबत बंड केला होता. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा आमदारांसोबत गुवाहाटीला जाणार आहेत. यावरुनच राष्ट्रवादी (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुक्ताईनगरमध्ये अंतुरली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली असून यावेळी त्यांनी कविताच केली आहे.

यादरम्यान, प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते, असं सांगतानाच भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंजवाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत 40 आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची, अशी काव्यमय टीका खडसेंनी केली आहे.

तसेच, काय ती झाडी, काय तो डोंगर हे पाहण्यासाठी जात आहेत. आपण आपल्या आठवणी ताज्या करूया असं सांगून आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आमदारांना घेऊन जात आहेत, असं देखील एकनाथ खडसे म्हणाले.

कसला कायदा? कसली सुव्यवस्था? सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे, या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, पण दोन रुपये किलोचे धान्य तरी द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा. सर्वात जास्त आत्महत्या तीन महिन्यात झाल्या आहेत, असं देखील खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Khadse | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपुर्वी गुवाहाटीला जावून ४० आमदारांसोबत बंड केला होता. अशातच एकनाथ शिंदे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now