चव्हाणांबरोबर विमान प्रवासानंतर खडसेंची राहुल गांधींशी भेट ?

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे नाराज नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण व मोहन प्रकाश यांच्याशी औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. हे तिघे विमानातून दिल्लीला एकत्रही गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यापुढची घडामोड म्हणजे, दिल्लीत खडसेंनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सामना या दैनिकाने विश्वसनीय सूत्रांच्या आधारे ही बातमी दिली आहे.

दरम्यान, नाराज खडसे यांनी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. असे असले तरी कॉंग्रेस प्रवेशाबाबत खडसे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे. औरंगाबादहून दिल्लीपर्यंतच्या प्रवासात मोहन प्रकाश व पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भेट झाली. दिल्लीत गडकरींशीही भेटलो. पण तेथे शहाद्यातील साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाचे आमंत्रण दिले असल्याचे खडसे म्हणाले.

तर दुसरीकडे याबाबत खडसेंनी स्पष्टीकरण देताना, पृथ्वीराज चव्हाण आणि मोहन प्रकाश यांची विमानतळावर योगायोगाने भेट झाल्याचं म्हटलं. कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असंही खडसे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...