महावितरणचा प्रताप : एकनाथ खडसेंना पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल

eknath khadase

जळगाव – महिन्याला साधारणतः 500 ते 700 रुपये वीजबिल येणाऱ्या लोकांना 3 महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लगतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना पडलाय.

तर सर्वसामन्यांच नव्हे तर अनेक नेत्यांना देखील या वाढीव वीजबिलाचा सामना करावा लागत अआहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचं हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी तसंच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

दरम्यान, वाढीव वीजबिलाच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

एका बाजूला मनसे आणि भाजपने याविरोधात एल्गार पुकारला असताना आता शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. कोकणातील बंद शाळांना भरमसाट बिलं आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. महावितरणला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्र लिहित चांगलंच झापलं आहे. शाळा 3 महिने बंद असताना एवढं बील आलंच कसं? असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. शाळांना कोणच्या आधारावर ही वीज बिलं आकारली? विनायक राऊत असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी

मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी

राज्य सरकारची तत्परता;मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात