…तर विधानसभेत गोंधळ घालू – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

टीम महाराष्ट्र देशा : ”उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. तो निधी उपलब्ध झाला नाही तर विधानसभेत गोंधळ घालू,” असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथे एकनाथ खडसेंच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते.

यावेळी बोलताना मी 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण पक्षानेच जर दूर केले तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही असही एकनाथ खडसे म्हणाले.