राजकीय आरोपांमुळे नैराश्यात असलेल्या नाथाभाऊंचा मोठा निर्णय

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नेहमी वेगेवेगळ्या कारणांमुळे तसेच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र खडसे यांनी केलेल्या विधानामुळे ते प्रचंड नैराश्यात आहेत कि काय असा सवाल उपस्थित झाला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान खडसे यांनी आपल्याला राजकारणाचा वीट आल्याच सांगितल आहे.

मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आला असल्याचं सांगत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे खडसे यांनी जाहीर केले आहे.मधल्या कालखंडामध्ये मी जे अनुभवलं त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागल्याचेही ते म्हणाले. विधानसभा लढवण्याबाबत देखील अजून ठरवलं नसल्याचे सांगत नाथाभाऊंनी खळबळ उडवून दिली आहे.

Loading...

ज्या व्यक्तीने 40 वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केला त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असा प्रसंग कोणावर येऊ नये. हे मला क्लेशदायक वाटते. जो मनस्ताप मला सहन करावा लागला ती म्हणजे शनीची साडेसाती असल्याचे मला वाटते. तो शनी कोण आहे हे देखील मला माहित असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

पुन्हा बंडखोरी की भाजपची उमेदवारी ; पहा रोहन देशमुख यांची सडेतोड मुलाखत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले