… खरतर मीच मुख्यमंत्री असायला पाहिजे होतो – एकनाथ खडसे

जळगाव : जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बऱ्याच काळापासून मंत्री पदापासून दूर असलेले खडसे भाजपवर नाराज आहेत. अनेकवेळेला त्यांनी ही खदखद जाहीररित्या बोलून देखील दाखवली. आता पुन्हा एकदा पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून, त्यांनी पुन्हा एकदा पक्षावर असलेली आपली नाराजी दाखऊन दिली.

जळगावमधील आयएमए हॉलमध्ये इइएसएल आणि चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, खरतर पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मीच मुख्यमंत्री पदाचा दावेदार असायला हवं होत, जळगाव पालिका निवडणुकीत खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचं दाखविलं जातं. आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्या सर्वांचा मीच नेता आहे असंही खडसे यावेळी म्हंटले

तसेच जळगाव महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली आणि पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला.दरम्यान जळगाव महापालिकेत भाजपला दणदणीत विजय मिळाल्याने,खडसे यांचं पक्षात वजन वाढल्याचं मानण्यात येत आहे.

खडसे नरमले : गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार!

खडसेंचा व्यवसाय शेती मग इतकी संपत्ती कशी ?