एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर केली टीका; म्हणाले, “मी कृषिमंत्री असताना…”

eknath khadse

जळगाव: कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद होते आणि त्यामुळेच भाजी-पाल्याची मागणी घटल्याने शेतकऱ्यांना देखील कमी भाव मिळाला होता. काहींचं तर वाहतुकीचा खर्चचं निघत नसल्याने जनावरांना भाज्या खायला देऊन किंवा त्या टाकून द्यावी लागल्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे, कधी बोगस बियाणं, कधी दुष्काळ, कधी महापुर, वादळ, कीड अशा नुकसानीच्या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला अधिक भार पेलावा लागला.

अशातच, आता खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकरी पेरणीच्या गडबतीत आहेत. कित्येक जिल्ह्यात तर पावसाच्या हजेरीमुळे पेरणी देखील झाली आहे. मात्र, बोगस बियाणांनंतर आता राज्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. कित्येक शेतकऱ्यांना तर दिवसभर रांगेत थांबून शेतजमिनीसाठी आवश्यकता असलेले पुरेसे खत देखील मिळत नाही. शासन कोरोना महामारीत व्यस्थ असल्याने शेतकऱ्यांच्या या अडचणी कडे लक्ष देणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

यावर आता, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. “मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊ दिली नाही” असे म्हणत खडसेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. “सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा वेळोवेळी व्हावा, अशी मागणी करताना सरकारचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याचा घणाघातही एकनाथ खडसे यांनी केला. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

तसेच त्यांनी, “मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी समन्वय होता. नीटनेटकेपणाने त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही”. दरम्यान, “साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी”, झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मुंबईसह धारवीचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलं पुन्हा कौतुक

IMP