Share

Eknath Khadse | “… म्हणून गिरीश महाजनांनी सुरक्षा नाकारली”, एकनाथ खडसेंचा घणाघात

Eknath Khadse |  सुरक्षेच्या मुद्यावरुन भाजप नेते गिरीश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांच्यावर आक्रमक झाले होते. अशात आता एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. खडसेंवर टीका करताना महाजन यांनी त्यांची सुरक्षा नाकारल्याचा उल्लेख केला होता. यावरुनच खडसेंनी त्यांना टोला लगावला आहे.

एकनाथ खडसे यांचा घणाघात –

गिरीश महाजन यांचे अनेकांसोबत चांगले संबंध असल्याने त्यांना रात्री बेरात्री अनेक जण भेटायला येतात, त्यांना ते एकांतात भेटतात, त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित महाजन यांनी सुरक्षा नाकारली असेल, असी बोचरी टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

1993 ला बाँम्बस्फोट झाले, तेव्हा सीमीविरोधात मी आंदोलन केलं, नंतरच्या कालखंडात 26-11 ची घटना घडली, त्यावेळी अनेक अंडरवर्ल्डमधल्या लोकांची मी नाव घेत असल्याने मला दुबई, युईमधून फोन येत होते, पोलिसांनी ते व्हेरिफाय देखील केले. त्यामुळं 1993 पासून आजपर्यंत मला सुरक्षा व्यवस्था पुरविली होती, असं खडसेंनी सांगितलं. तसेच सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं माझं सुरक्षा कवच रात्री काढून घेण्यात आलं. रात्री तीन वाजता बैठक होते. त्यात असा निर्णय घेतला जातो, असं देखील ते म्हणाले.

मी भाजपमध्ये असताना टीव्हीमध्ये दिसण्यासाठी गिरीश महाजन माझ्या मागे उभे राहायचे, आता टीव्हीवर दिसण्यासाठी ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्र्यांच्या मागे उभे राहतात, असा टोला देखील खडसेंनी लगावला आहे.

एकनाथ खडे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यावरुनच एकनाथ खडसे हे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे.

जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी खडसेंची मागणी होती. यासाठी ते जळगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. त्यामुळे तब्बल १८ तास खडसेंनी तिथं ठिय्या केला. अखेर जयंत पाटलांच्या सांगण्यावर हे आंदोलन थांबवण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Khadse |  सुरक्षेच्या मुद्यावरुन भाजप नेते गिरीश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांच्यावर आक्रमक झाले होते. अशात आता …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now