मला मंत्रिपदावरुन काढण्याचं राजकारण केलं जात आहे : एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज सकाळी तातडीने दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्या अचानक दिल्लीला जाण्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. दरम्यान काही दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज असल्याचा चर्चा सुरु आहेत. अशातच त्यांनी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल..असा ईशारा दिल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षावर हल्लाबोल केला. “पक्षात माझ्यावर वेगवेगळे आरोप लावून मंत्रिपदावरुन काढण्याचं राजकारण केलं जात आहे. इतकंच काय तर आपल्याच लोकांना हरवण्याचा काम देखील केलं जात आहे. याचे पुरावे मी मांडलेले आहे. त्यामुळे मी याबाबत नक्की विचार करेन. पण पक्ष सोडणार नाही.” असेही खडसेंनी स्पष्ट केले.

Loading...

त्यानंतर ते म्हणाले, मला जाणीवपूर्वक छळण्यात आलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढताना जगाला न पटणारे आरोप केले गेले. दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले. विधानसभेला तिकीट नाकारलं. शिवाय मुलीला तिकीट देऊन स्वत:च्या पक्षातील लोकांनी जाणीवपूर्वक मुलीचा पराभव केला.”
तसेच “मंत्रिमंडळातून बाहेर काढताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. मला छळण्याचा प्रयत्न केला गेला. मला तिकीट न देणं, मुलीला तिकीट देऊन पक्षातीलच लोकांनी पाडलं.” अशी टीकाही खडसे यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर