Share

Eknath Khadse | “मला त्रास दिला तर…”; एकनाथ खडसेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Eknath Khadse | जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse)  महसूलमंत्री असताना 2016 मध्ये त्यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. खडसेंनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराने भूखंड पत्नी आणि जावयाच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे खडसेंना मंत्रिपद गमवालं लागलं होतं. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ (Eknath Khadse) खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिलाय.

“माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूका सुलभ करण्यासाठी जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. पण, हे सर्व मी हाणून पाडत आहे. रोज मला व्हॉट्सअॅपवर ‘काहीतरी होणार आहे’, असे मेसेज येतात. मात्र, मला त्रास दिला तर, तुमच्या बोकांडी बसेन,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है, कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी तुमच्या उरावर बसणार आहे असा इशारा जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात दिला आहे.

पुढे ते म्हणाले, “कामाच्या आणि संपर्काच्या बळावर तुम्ही ४० वर्ष मला साथ दिली. कामाच्याबाबत मागे राहणार नाही. त्यामुळे पुढच्या काळातही अशीच साथ राहु द्या. मात्र, विरोधकांना माझी अडचण होत आहे. आयुष्यभर एक रुपयाही गैर मार्गाने मी कमवला नाही,” असेही खडसे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Khadse | जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse)  महसूलमंत्री असताना 2016 मध्ये त्यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. खडसेंनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now