भाजपात घुसमट होतीये – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

टीम महाराष्ट्र देशा : भूखंड घोटाळ्याचा आरोप असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीपदापासून दूर आहेत. त्यामुळे खडसे हे पक्षावर नाराज असून, भाजपमध्ये आपली घुसमट होत असल्याचं  त्यांनी म्हंटलं आहे. तसेच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचंही म्हंटलं.

दरम्यान मंत्रिपद गमवावं लागल्यानं पक्षावर नाराज असलेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्यात नाथाभाऊ आणि अजित पवार अनेकवेळा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाल्याने तर्क – वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाचा आपण विचारही करू शकत नसल्याचं त्यांनी त्यावेळी म्हंटल्याने चर्चेला पूर्ण विराम मिळाला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजप विरोधी सूर आळवला आहे.

खडसेंचा अंजली दमानियांविरोधात खटला

खडसे नरमले : गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार!