मी गैरव्यवहार केला असल्यास सरकारने तो जनतेसमोर आणावा; खडसेंचे सरकारवर शरसंधान

जळगाव : मी गैरव्यवहार केला असल्यास सरकारने तो जनतेला दाखवावा, अशा शब्दात माजी महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे. जिल्ह्यातील बोदवड व मुक्ताईनगर भागातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हेही उपस्थित होते.

ज्यांनी रोपटे लावले तोच उन्हात जाऊन बसला असल्याने कोणाकडून अपेक्षा करायची, असा प्रश्न पडला असल्याचेही खडसे म्हणाले. दोन दिवसांपूर्वीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात खडसे यांनी स्वपक्षातील नेत्यांवर टीका केली होती.

You might also like
Comments
Loading...