ज्यांची पात्रता आहे, ते बाहेर आणि अपात्र लोक तेथे बसले आहेत – एकनाथ खडसे

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : सरदार वल्लभभाई पटेल हे या देशात जन्माला आले , हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले व त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथर्पयत पोहचले. मात्र आज परिस्थिती उलट आहे. ज्यांची पात्रता आहे ते आज बाहेर आहे तर ज्यांची पात्रता नाही ते तेथे बसले असले आहेत. अशी टीका भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केली आहे. भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे लेवा पाटील समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार रमेश चौधरी, महाअधिवेशन समितीचे अध्यक्ष विष्णू भगाळे, शिरीष चौधरी, शामल सरोदे, मंदा खडसे आदि मान्यवर या अधिवेशनास उपस्थित होते, पण एकनाथ खडसे यांच्या भाषणाकडे राज्यच लक्ष लागल होत. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षाला लक्ष करत टीका केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल