Share

Eknath Khadse | “हिंमत असेल तर कारनामे बाहेर काढा”, एकनाथ खडसेंचं महाजनांना आव्हान

Eknath Khadse | मुंबई : शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर केला होता. यालाच प्रत्युत्तर देत असताना लवकरच एकनाथ खडसे यांचे कारनामे बाहेर येतील, असा इशारा दिला होता. याला आता राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी आव्हान दिलं आहे.

मी काय भ्रष्टाचार केला? असा सवाल करत तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा. मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या, असं आव्हान एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

भ्रष्टाचार करायचा आणि वरून लोकांना शिकवायचं? हे बरोबर नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. ॲडव्होकेट बाळू पाटील यांनी जामनेर नगरपालिके अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी का थांबली? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.

एकनाथ खडसेंना भरपूर वेळ असल्याने ते इकडे तिकडे फिरत राहतात. मात्र त्यांचेही कारणामे लवकरच समोर येतील, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे. तसेच रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुन्हा एकदा खडसे-पाटील आणि महाजन यांच्यात ठिणगी पडली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Khadse | मुंबई : शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now