fbpx

‘नाथा भाऊ मोठ्या मनाचा नेता’, जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ खडसेंच कौतुक

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते, कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे कौतुक केले आहे. एकनाथ खडसे हे मोठ्या मनाचे नेते. असं कौतुक करणारे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. देशात लोकसभा निवडणूक आताच पार पडली. येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी अतिशय खालच्या पातळीवर एकमेकांवर टीका केलेली पाहायला मिळाली. याचदरम्यान, राष्ट्रावीदीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते, कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे कौतुक केले आहे.

आज, देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. दरम्यान, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर ट्विट करत दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. एकनाथ खडसे यांनी आदरांजली वाहिल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती, एकनाथ खडसे मोठ्या मनाचा नेता. असे म्हणत आव्हाड यांनी एकनाथ खडसे यांच कौतुक केले आहे.