भाजपच्या महामेळाव्यात पंकजा आणि खडसेंना माईक नाहीच…!

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या ३८ व्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत महामेळाव्याच आयोजन करण्यात आलं होत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने पक्षाने या मेळाव्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू होती. या मेळाव्यासाठी राज्यभरातून जवळपास ५ लाख लोक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...

या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाषण करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

दरम्यान, भाजपच्या या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने बहुजनांवर अन्याय केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी मंचावर जाऊन शांत केल. मात्र, पुढे मेळाव्यात पंकजा मुंडे किंवा भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाषण करण्याची संधी न मिळाल्याने भाजप मधील एक मोठा वर्ग नाराज झाल्याच चित्र या महामेळाव्यात पाहायला मिळाल.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपच्या विरोधात मोर्चा खोलून आहेत त्यामुळे भाजप अनेक वेळा अडचणीत आले असल्याने जळगाव येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे यांच्या मंचावर सुद्धा जाण्याच टाळाल होत. त्यामुळे भाजप पक्षाला जनमानसात घेऊन जाणाऱ्या एकनाथ खडसे यांना वर्धापन दिनी बोलण्याची संधी मिळते का ? याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागलं होत. मात्र भाजपने येथेही एकनाथ खडसे यांना डावलल्याच पाहायला मिळालं.Loading…


Loading…

Loading...