एकनाथ खडसेंनी व्यक्त केली ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांनी ‘मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे आणि पक्षाकडे मीच उमेदवारीची मागणी करणार आहे’ असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या जागेची उमेदवारी आता कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading...

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यात आहे. परंतु यावेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगली होती. परंतु आता खुद्द खडसे यांनीच या जागेवर दावेदारी केली असल्याने यात आता चुरस वाढली आहे. याविषयी खडसे यांनी ‘पक्ष जो निर्णय घेईल, तो घेईल, मात्र या मतदार संघातून मीच इच्छुक आहे असं विधान केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे याविषयी बोलताना ‘भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. तसेच पक्षात येण्यापूर्वी नेत्यांची निष्ठा तपासा असं खडसे म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ