न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भुजबळांनी का भोगावी- एकनाथ खडसे

chagan bhujbal and eknath khadse

मुंबई / नाशिक: छगन भुजबळ हे वर्षानुवर्ष बहुजन समाजासाठी काम करणारे नेते असून त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगावी असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, की एखाद्या व्यक्ती विषयी जाणीवपूर्वक काही ठरविले जात असेल तर त्याला न्याय मिळत नसतो. मात्र भुजबळ समर्थकांनी सुरु केलेल्या अन्याय पे चर्चेमधून समाजामध्ये जागृती निर्माण होईल. तसेच भुजबळांना कायद्याच्या चौकटीत न्याय मिळायला हवा अशा भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भुजबळ समर्थकांकडे व्यक्त केल्या.
दरम्यान भुजबळ समर्थकांनी शेकापचे नेते आ.जयंत पाटील यांची दखल घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी मी छगन भुजबळ यांच्या सोबत असून मुंबईत होणाऱ्या आंदोलनास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी भुजबळ समर्थकांना दिले.