मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावरून एकनाथ खडसेंनी सोडलं मौन म्हणाले…

Eknath khadase bjp

मुंबई : १०५ आमदार निवडून येऊन सुद्धा विरोधी पक्षपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील नेत्याची तथाकथित नाराजी वेळोवेळी समोर आली आहे. तर आता या नाराजीचा उद्रेक होऊन पक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याचे आज सकाळपासून होणाऱ्या राजकीय बैठकांवरून वर्तवले जात आहे. भाजपचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले होते.

नाथाभाऊच ठोकणार भाजपला राम-राम?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

तर, पक्ष प्रवेशावरून नाथाभाऊंनी अखेर मौन सोडलं आहे. ” हा विषय आपल्याला नसल्याचे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले. यासोबतच या विषयावर ज्यांनी ही चर्चा सुरु केली त्यांनाच तुम्ही विचारा” असं सांगून पक्ष बदलावर चर्चांना काहीसा लगाम लगावला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतात:

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार  यांनी एकनाथ खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

“दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही, प्रतिबंध घालतो. त्यामुळे खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारच शिवू शकत नाही. हा विचार माझ्याही मनात शिवू शकत नाही आणि त्यांच्या मनात हा विचार येऊ शकत नाही.” अस देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :