fbpx

एकनाथ खडसेंना भाजपच्या कोर कामिटीतून वगळण्याची शक्यता

khadse eknath_6

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीमधून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेक नेते पक्षांतर करत आहेत. तसेच भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे या निवडणुकीच्या मोसमात चांगलेच सक्रीय होताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीमध्ये गिरीश महाजन यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

तसेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नव्याने काही नेत्यांची भरती करण्यात आली. तर ही भरती करण्यामध्ये गिरीश महाजन यांचा मोठा हात होता.तसेच एकनाथ खडसे यांच्या ऐवजी गिरीश महाजन हे या निवडणुकीत भाजपकडून चांगलीच भूमिका बजावत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर रावसाहेब दानवे , चंद्रकांत पाटील , सुधीर मुनंगटीवार हे असणार आहेत तर चौथा मेंबर म्हणून गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.