एकनाथ खडसेंची नाराजी पुन्हा समोर; नियोजन समितीच्या बैठकीत मांडल्या समस्या

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपवरील नाराजी पुन्हा समोर आली आहे. जळगावातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे यांनी घरचा आहेर देताना आपल्या मतदार संघातील विविध समस्या मांडत भाजपला घरचा आहेर दिला आहे.

या बैठकीत खडसे यांनी आपल्या मतदार संघातील विविध समस्या मांडल्या. काही गावात शाळांमध्ये शिक्षकच नाही तर काही गावातील गावच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. जनतेचा रोष आपल्याला सहन करावा लागत असल्याचे खडसेंनी सांगितले. जळगाव येथील राहत्या घराचे लाईटबिल सुमारे २२००० रुपये आल्याचेही त्यांनी सांगून महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत जळगावचे पालकमंत्री गिरिज महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, भाजपवर नाराज असण्याची खडसे यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी सभागृहातील भाषणातही भाजपवरील आपला रोष व्यक्त केला होता.