आमचा वेळ केवळ अभ्यास करण्यातच वाया जातोय ; एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

नव वर्षाच्या सुरुवातीला खडसेंची मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका

टीम महाराष्ट्र देशा: आमचा केवळ अभ्यास करण्यातच वेळ जातो, असा सणसणीत टोला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यामुळे मुख्यमंत्री तसेच भाजप आणि खडसे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. खडसेंनी सरकारविरोधातील टिकेला आणखी धार आणल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नांदुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलेला टोला यावर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे.

एकनाथ खडसे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. तरीदेखील मागील काही दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज असल्याच उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे आज नववर्षाच्या सुरुवातीला खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केलीली पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खडसे यांची नाराजी उघड झाली आहे.

You might also like
Comments
Loading...