Share

Eknath Shinde | सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई :  राज्यात परतीचा पाऊस झाल्यामुळे शेकऱ्यांना खूप नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करत आहेत. अशातच काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. त्याचबरोबर ही मागणी पूर्ण नाही झाल्यास  सरकार बरखास्त करण्याची भाषा देखील पटोलेंमी केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

नाना पटोले यांनी केलेले भाष्य हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात मोठं बहुमत असलेलं भक्कम पाठिंब्याचं सरकार स्थापन झालं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

तीन महिन्यांत आम्ही 72 मोठे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा 397 जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. आमच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाला 243 जागा मिळाल्या आहेत. इतरही येऊन भेटत आहेत. या यशामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष बोलतच असतो. विरोधी पक्ष टीका करत आहेत. पण त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

नाना पटोले यांचे वक्तव्य 

दरम्यान, परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे बळीराजाचं सरकार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. एनडीआरएफच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची नुकसानभरपाई आपण दिलेली आहे. पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं होतं की, दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई :  राज्यात परतीचा पाऊस झाल्यामुळे शेकऱ्यांना खूप नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते ओला दुष्काळ जाहीर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now