fbpx

पुण्यात पाळणाघरातील तीन वर्षाच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी केला लैंगिक अत्याचार

शहरात आई-वडील असे दोघे मिळून नोकरी करणाऱ्यांची बहुतांश  मोठी संख्या आहे. यामुळे मुलांना   पाळणाघरात ठेवण्यात येते. अशाच एका पुण्यातील कोथरूड येथील  एका पाळणाघरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरूणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादाय घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार कोथरूड पोलिसांनी तिघांच्या विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाळणाघरचालक महिलेसह दोन मुलांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपीला ताब्यात अटक करण्यात आली आहे.

फिर्याददार या नोकरी करतात. त्यामुळे त्या त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला कोथरूडमधील एका घरगुती पाळणाघरात ठेवत होत्या. यादरम्यान पाळणाघरचालक  महिलेचा १७ वर्षांचा मुलगा व  त्याचा १८ वर्षांचा मित्र हे दोघे मिळून  पीडित मुलीवर अत्याचार करत होते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर कपडे काढून झोपत होती. पालकांना हा विचित्र प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी त्या मुलीकडे चौकशी केली. त्या वेळी तिने पाळणाघर येथील दादानेच असे कारायचे असल्याचे सांगितले. त्यांनंतर अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.