‘एक विहारी सब पर भारी’, भाजप खासदाराच्या टीकेवर सेहवागच प्रतिउत्तर

sehvag

मुंबई : जखमी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांची खेळपट्टीवर उभी राहण्याची जिद्द आणि सयंमी बॅटिंगमुळे भारतानं सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात यश मिळवले होते. ही टेस्ट ड़्रॉ झाल्यानं सध्या ही सीरिज 1-1 अशी बरोबरी केली. हनुमा विहारीच्या या कामगिरीचे क्रिकेटच्या जाणकारांडून एकाबाजूला कौतुक होत आहे. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली होती.

हनुमा विहारीने भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अश्विननेही फिरकी घेतली आहे. हनुमाने बाबुल सुप्रियाच्या ट्विटला प्रत्युतर देत टोला लगावला आहे. सुप्रिया यांनी हनुमा विहारीवर संथ खेळीवरुन टीका केली होती. या ट्विटमध्ये सुप्रिया यांच्याकडून हनुमाचं आडनाव लिहिताना चुक केली. सु्प्रिया यांनी विहारीऐवजी बिहारी लिहिलं. यावरुन विहारीने सुप्रियो यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.

हनुमा विहारीनं सुप्रियो यांच्या टीकेवर एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रियो यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विहारीचं चुकीचं नाव लिहलं होतं. त्यांनी विहारीचा उल्लेख हनुमा बिहारी असा केला होता. विहारीनं फक्त योग्य नाव लिहून त्यांची चूक सुधारली आहे.

भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्यानं विहारीच्या या टिकेनंतर ‘एक विहारी सब पर भारी’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.विहारीच्या स्ट्रेट ड्राईव्ह इतकाच सेहवागचा सिक्सर देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या