‘एक लडकी को देखा तो..या ट्रेडिंग गाण्यावर गौतमीचा लक्षवेधी लूक

goutami

मुंबई : छोटया पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी देशपांडे अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली गौतमीने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. गुलाबी रंगाची साडी, क्रिम रंगाचं ब्लाउज आणि केसात माळलेला गजरा असा हा गौतमीचा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

‘एक लडकी को देखा तो.. या हिंदीतील ट्रेडिंग गाण्यावर तिनं तिच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पाहूण चाहत्यांनी लाईक आणि कमेंटची बरसात केली आहे. तसेच ‘आँखों की गुस्ताखियाँ माफ हो’ असे कॅप्शन देत गौतमीने याच साडीवरील काही फोटो ही शेअर केले आहे. सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या व्हिडिओ व सुंदर फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.

‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी यामाध्यमाने कनेक्ट होत आहे. ती नेहमीच नवनवीन फोटोशूट करत असते मात्र आता तिनं हटके फोटोशूट आणि व्हिडिओ देखील शेअर केले.

महत्त्वाच्या बातम्या