काश्मीर खोऱ्यात ईद उत्साहात, डोवल यांनी अतिसंवेदनशील भागात केली पाहणी

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द केले आहे. हे कलम रद्द करताना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने जमावबंदी लागू केली होती.या जमावबंदीमुळे जम्मू काश्मीर खोऱ्यात गेले काही दिवस शांतता होती. मात्र आज ईद असल्याने जमावबंदी हटवण्यात आली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बांधवानी एकत्र येत ईद शांततेत आणि उत्सहात साजरी केली. या संबंधीचा आढावा देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी घेतला. त्यांनी स्वतः काश्मीरच्या अतिसंवेदनशील भागात पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला.

कलम 370 हटवल्यामुळे काश्मीर खोऱ्यात मोठा हंगामा होण्याची भीती केंद्र सरकारला वाटत होती. त्या दृष्टीने काश्मीर खोऱ्यात जमावबंदी लागू केली होती. या जमावबंदीमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यात व्यापार, शाळा , महाविद्यालये, प्रशसकीय कार्यालय गेले अनेक दिवस बंद होती. तर रस्त्यावर एक प्रकारचा शुकशुकाट पसरला होता. मात्र आज बकरी ईद असल्याने जमावबंदी हटवण्यात आली. आणि मुस्लीम बांधवांना ईद साजरी करून दिली. आज श्रीनगरमध्ये बकरी ईद शांततेत पार पडली. सुमारे ६२ हजार लोकांनी येथील वेगवेगळ्या मशिंदींमध्ये नमाज पठन केलं. ईद निमित्त अनंतनाग, बारामूला, बडगाम आणि बांदीपूर येथील नागरिकांनी मिठाईंचं वाटप केलं.

Loading...

दरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अजित डोवल यांनी आज अचानक काश्मीर गाठले. त्यांनी काश्मीर खोऱ्यात हवाई पाहणी करून ईदचा उत्साह आणि सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी अचानक लाल चौक, पुलवामा आमि बेलगाममध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या या भागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सौरा, पंपोर आणि हजरतबल या परिसरातही पाहणी केली. सौरामध्ये नेहमीच भारताविरोधात निदर्शने व्हायची, त्या परिसराची पाहणी करून डोवल यांनी नागरिकांशी चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक