एहसानच्या साथीनं विद्यार्थ्यांचं ‘रॉक ऑन’

पुणे : ‘तू धूप है, तू छाव है’ गुणगुणताना ‘तारे जमीन पर’ अवतरले, तर ‘कल हो ना हो’ म्हणत ‘दिल चाहता है’ चा अनुभव दिला. ‘जिंदा है तो’ गात एहसानच्या साथीनं विद्यार्थ्याचं ‘रॉक ऑन’ मंगळवारी पाहायला मिळालं! आपल्या आवडत्या संगीतकारांबरोबर ‘सेल्फी फोटोग्राफ आणि आटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली.

Loading...

निमित्त होतं, केजे एज्युकेशनल इंस्टीट्युटच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलमधील संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध संगीतकार एहसान नूरानी यांनी घेतलेल्या ‘मास्टरक्लास’चं. ‘टॉरन्स अकॅडमी’च्या वतीने ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलमधील विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले जात आहे. या ‘मास्टरक्लास’नंतर रंगलेल्या ‘जामसेशन’मुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

यावेळी केजे एज्युकेशनल इन्स्टिटयूटचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या प्रीती सांगवान, टॉरन्स अकॅडमीचे सुनील सुंदरन आणि शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एहसान नूरानी म्हणाले, संगीत मला आवडते आणि मी ते जगतो. सतत नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न संगीतकाराने केला पाहिजे. मनातील भीती दूर करून वाजवत राहणे महत्वाचे असते. संगीतामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाला आकार येतो. त्यामुळे एखादे तरी वाद्य वाजवण्यास आपण शिकावे. शाळा-महाविद्यालयांनी संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. ट्रिनीटीचा पुढाकार कौतुकास्पद आहे. जुन्या काळातील हेमंतकुमार, आर. डी. बर्मन, ए. आर. रहमान हे माझे आवडते संगीतकार आहेत.

हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, माणसाला जीवनात आनंदी ठेवण्यासाठी संगीत अतिशय महत्वाचे आहे. आपण जे संगीत वाजवतो ते स्मरणीय होते. एहसान यांची अनेक गाणे स्मरणात राहणारी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा.

सलमानने एका सीनसाठी वापरली तब्बल ५००० काडतुसे

व्हेनेझुएलात फडकला मराठी झेंडा

लव सोनियाच्या चित्रीकरणावेळी सई ताम्हणकरला आले होते फ्रस्ट्रेशन

#MeToo : अनु मलिक यांची ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हकालपट्टी

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...