ऐन थंडीच्या काळात अंड्यांचे भाव कडाडले

international egg day

टीम महाराष्ट्र देशा: थंडीचा मौसम सुरु झाला की आपोआप नॉनवेज पदार्थांकडे आपला कल वाढत असतो. सध्या राज्यात थंडीने जोर पकडला असताना ऐन थंडीच्या काळात शरीरासाठी पौषक असलेल्या अंड्यांचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत.

बाजारात सध्या अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे एका बॉयलर अंड्याची किंमत ७ ते ८ रुपये इतकी झाली आहे म्हणजे डझनभर अंडी घेतली तर ७५ ते ८० रुपये मोजावे लागतील. तर देशी अंड्याची किंमत तर याहूनही जास्ती आहे एका देशी अंड्याला जवळपास ११ ते १२ रुपये मोजावे लागतात म्हणजे डझनभर देशी अंडी घेतली तर १२० ते १३० रुपयांच्या घरात जातात. पुढील काही दिवसात थंडीचा जोर अजून वाढला तर अंड्यांचे दर देखील वाढण्याचे शक्यता आहे. त्याचबरोबर चिकन आणि मटन यांच्या किमतीत देखील कमालीची वाढ झाली आहे.