Share

Skin Care Tips | अंडी आहेत त्वचेच्या ‘या’ समस्यांसाठी रामबाण इलाज

टीम महाराष्ट्र देशा: अंड्यामध्ये Egg अनेक पोषक घटक आढळून येतात. अनेकदा डॉक्टरही आपल्याला निरोगी राहण्यासाठी अंडी खाण्याचे सल्ला देतात. कारण अंडी खाल्ल्याने शरीराला एकाच वेळी अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर केसांची निगा राखण्यासाठी देखील केसांना अंडी लावण्याचे सल्ले दिले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? केसांबरोबरच अंड्याचा वापर चेहऱ्यावर Skin केल्याने चेहरा अधिक चांगला होऊ शकतो. चेहऱ्यावर अंडी लावल्यावर तुम्ही त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकतात. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अंड्याचा चेहऱ्यावर कसा उपयोग करायचा याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अंड्याचा वापर करावा

स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण ब्लॅकहेड्स समस्या पासून त्रस्त आहे. ब्लॅकहेड्समुळे आपला चेहरा देखील घाण दिसायला लागतो. अंड्याचा पांढरा भाग ब्लॅकहेड्स काढण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. अंड्याच्या मदतीने ब्लॅकहेड काढण्यासाठी अंड्याच्या आतील पांढरा भाग घेऊन त्यामध्ये थोडी कॉर्न स्टार्च पावडर घाला आणि एक चमचा साखर घाला. त्यानंतर हे तयार झालेले मिश्रण ब्लॅकहेड्स वर लावा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. नियमितपणे हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यावर ब्लॅकहेड्स ची समस्या दूर होऊ शकते.

ड्राय स्किन साठी अंड्याचा वापर ठरेल फायदेशीर

जर तुमची त्वचा कोरडी असेल तुम्ही त्यासाठी अंड्याचा वापर करू शकता. मॉइश्चराईजर लावल्यानंतरही तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता. ड्राय स्किनसाठी अंड्याच्या आतील पांढरा भाग घेऊन, त्यामध्ये एक छोटा चमचा मध घाला. हे मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर राहू देऊन नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. मध आणि अंड्याच्या आतील पांढरा भाग तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करतो.

चेहऱ्यावर अंडी लावल्याने रिंकल्स ची समस्या कमी होऊ शकते

चेहऱ्यावर उत्पन्न झालेली रिंकलची समस्या अंडी लावून दूर करता येते. यासाठी तुम्हाला अंड्याच्या आतील पांढरा भाग आणि त्यामध्ये थोडी हळद मिक्स करून ते तुमच्या चेहऱ्याला नियमितपणे लावावे लागेल. यामुळे तुमच्या रिंकलशी समस्या कमी होऊन त्वचा चमकदार बनू शकते.

अंड्याची समस्या अक्ने दूर करण्यास देखील मदत करते

अक्ने ची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. पण अंड्याच्या मदतीने तुम्ही समस्या दूर करू शकता. यासाठी तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या भागांमध्ये थोडे दही आणि अॅव्होकॅडो मॅश मिक्स करून ते चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण लावल्यावर वीस मिनिटे चेहऱ्यावर तसेच ठेवून नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अक्ने समस्या दूर होईल.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: अंड्यामध्ये Egg अनेक पोषक घटक आढळून येतात. अनेकदा डॉक्टरही आपल्याला निरोगी राहण्यासाठी अंडी खाण्याचे सल्ला देतात. कारण …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now