शिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार : शिक्षण सभापती विकास रेपाळे

blank

ठाणे :- ‘शिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, तसेच गुरुवर्य स्व.आनंद दिघे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिकवणीनुसार शिक्षकांच्या प्रश्नाला देखील प्राधान्याने सोडवणार आहे.’ असे सभापती विकास रेपाळे यांनी सांगितले.  ठाणे महानगरपालिकेत शिक्षण सभापती म्हणून नूतन निवड झालेल्या विकास कृष्णा रेपाळे यांच्या कार्यालयाचे उदघाटन महापौर मिनाक्षीताई शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेविका अनिता गौरी आदी पदाधिकारी यांच्या उपस्थित संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

ठाण्यात एकहाती सेनेचे सत्ता येऊन सुद्धा काही कारणास्तव रखडलेल्या महत्वाच्या समितींच्या निवडी मे महिन्यात झाल्या होत्या. त्यात शिक्षण विभागाची धुरा नव्या दमाच्या नगरसेवक विकास रेपाळे यांच्याकडे दिल्याने शैक्षणिक वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत होते. उच्चशिक्षित व्यक्ती या विभागाच्या सभापतीपदी तसेच सदस्यपदी नियुक्त झाल्याने एक नवा आदर्श महापालिकेने घालून दिला आहे.

blank

शिक्षण हा लोकशाहीचा गाभा आहे. सर्वोत्तम नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून ते प्राधान्य आहे, याच उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षण विभाग व शिक्षण समिती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते, असे महापौर मीनाक्षीताई शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर ‘शिक्षण हा माझ्या आवडीचा विषय असून त्यांच्या सर्व योजनांना मी सर्वोतोपरी नेहमीच मदत करत आलो आहे.’असे म्हणत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विकास रेपाळे यांना शुभेच्छा दिल्या.

तर आम्ही केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो – शिवसेना

शिक्षण उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, ठाणे पालघर पतपेढीचे अध्यक्ष बाबाजी फापाळे, संचालक प्रकाश गायकवाड, जगन जाधव, एक्का फौंडेशनचे प्राजक्त झावरे-पाटील, सचिन घोडे, अरुण घोडे, विकास चव्हाण यांनी रेपाळे यांचे अभिनदंन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी महापालिकेतील गटाधिकारी, गटप्रमुख आदी उपस्थित होते.

सध्या राष्ट्रवादी फक्त फेक अॅकाउंटवरच चालते – सुरेश धस