fbpx

ग्रामिण भागात प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील – प्रभाकर देशमुख

माढा – करमाळा असो की माण खटाव कोणत्याही ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची मुले अधिकारी झाली पाहिजेत. त्यासाठी स्पर्धा परिक्षा क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा झाली आहे. आम्ही राजर्षी शाहु अँकडमीच्या माध्यमांतुन स्पर्धा परिक्षा असो किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण मेळावे आयोजित करित असतो. सर्वच विद्यार्थी अधिकारी होणे शक्य नाही. म्हणुन तरुणांना रोजगाराच्या संधी ऊपल्बध करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज आहे. आज गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. सरकार दोन कोटी रोजगार ऊपल्बध करुन देणार होते. ते देण्यात सरकार अपय़शी ठरले आहेत. माढा करमाळा असो की माण खटाव ग्रामिण भागात तरुणांना रोजगार ऊपल्बध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहु असे माजी विभागिय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी टेभुर्णी येथै केले.

देशमुख कौशल्य विकास मेळावा व स्पर्धा परिक्षा मेळावा मध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणुन बोलत होते. पुढै बोलताना देशमुख म्हणाले की , मुठभर मावळ्यांना घेऊन ढिगभर मोघलांना गनिमी कावा पध्दतीने लढणं हा देखील एक कौशल्याचा एक भाग होता. तसचं आत्ता 21 शतकात देखील आपण कौशल्य विकास आत्मसात करुन रोजगार ऊपलब्ध करु शकतो. त्यासाठी अ.भा. मराठा शिक्षण परिषद , राजर्शी शाहु अँकडमी सृजन फाऊंडेशन सध्या कार्यरत आहेत. यावेळी आ. बबनदादा शिंदे , जि.प. अध्यक्ष संजय शिंदे , पुणे विद्यारिठाचे माजी कुलगुरु अरुण अडसुळ , हर्षदा देशमुख जाधव , जि.प. सदस्या चित्राताई वाघ , रणजित शिंदे , बंडुनाना ढवळे पं.स. सदस्या यशोदा ढवळे , दिलिपराव भोसले ऊपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय , शंभुशासन प्रतिष्ठाण , अटकेपार झेंडा यां संघटनांनी परिश्रम घेतले.