ऐन मतदानाच्या दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी दहशत माजविण्याचा प्रयत्न

blank

टीम महाराष्ट्र देशा : महिनाभर निवडणुकीचा प्रचारसभा सुरु होत्या. या प्राचार सभांमध्ये भांडणे वादविवाद होतात. मात्र आज ऐन मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांना उमेदवारांना मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवाला मारहाणीचे गालबोट लागले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांना मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. २१ ) पिंपरी येथे घडली. यामुळे पिंपरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

तसेच, अमरावती जिल्ह्यातला मोर्शी हा विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करत हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ भुयार यांना सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण केली. त्यावेळी शहरातील काही लोक मॉर्निंग वॉकला आले होते. त्यावेळी आलेल्या लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली.’

त्याचप्रमाणे सोलापूरमध्येही मतदान सुरळीत पार पडत असताना करमाळ्यात मात्र मतदानाला गालबोट लागलं आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या मारहाणीत पाटील यांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना डोक्याला मारहाण झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :