fbpx

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांनाही तिळगुळ

मुंबई : मकर संक्रांत आणि मंत्रिमंडळ बैठक एकच दिवशी आल्याने या निमित्ताने मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रकांत पाटलांनी सर्वाना तिळगुळ वाटले. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही चंद्रकांत पाटील यांनी तिळगुळ दिले.युतीमध्ये कायम गोडवा राहण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत . युतीमध्ये स्नेह रहावा असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तिळगुळ दिले.

लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने सध्या शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा सतत प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. भाजप-शिवसेना युती बाबत भाजपचे सध्यातरी मौन आहे. शिवसेनेबद्दल काहीही न बोलण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याआधी भाजप-शिवसेना युतीचा निर्णय मुंबईतच होणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपवर टीका मात्र सुरुच आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार की नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

भाजप-शिवसेना युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा केली आहे. चर्चेनंतर युतीचा निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती समजली दिली होती.

2 Comments

Click here to post a comment