‘मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गरज’

मुंबई : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खूप मोठा आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे.

याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा धोरण, बारावीसह उच्चशिक्षणामध्ये मराठीची सक्ती यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद जोशी, अनिल गोरे आणि प्राध्यापक प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त दैनिक त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

Loading...

तसेच आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पालकांमध्ये असलेले आकर्षण, घरी इंग्रजी बोलण्याचा धरलेला आग्रह. यामुळे मराठी घरातूनच मराठी भाषा हद्दपार होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्नांची गरज आहे,’ असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

दरम्यान, शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कला, साहित्य आणि संस्कृतीचा आविष्कार पहायला मिळणार आहे. आज ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभणार आहे. सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यंदा मरीन लाइन्स येथील मुंबई रुग्णालयाशेजारील बिर्ला मातुश्री सभागृहात 27 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश