मजा कशा पद्धतीने करावी आणि किती वेळ करावी याला मर्यादा हव्यात : विश्वास नांगरे पाटील

पुणे: कॉलेज आयुष्यात मजा करावी त्यात काहीच गैर नाही पण मजा करताना त्यावर देखील काही मर्यादा व वेळ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मजा करताना कश्या पद्धतीने करावी व किती वेळ करावी हे देखील तेवढच महत्वाच असल्याच मत पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात नांगरे पाटील बोलत होते.

अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे तरुण पिढी सोशल मीडीयाच्या जास्ती आहारी जात असल्याच चित्र सध्या दिसत आहे.

बारा वर्षाचा मुलगा रात्रभर इंटरनेटवर अभ्यास करत असायचा त्याच्या वडिलांना देखील त्याचा अभिमान वाटत असे परंतु रात्रभर अभ्यास करण्याच्या नादात त्या मुलाला वेळेच भानच राहत नसे त्यामुळे त्याचा उलट परिणाम त्या मुलावर होत आहे आणि या संदर्भात एक लेख वाचला असल्याच देखल विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. सोशल मिडीयाचा उपर एका मर्यादेपर्यंत चांगला आहे नंतर मुलांमध्ये विकृती वाढीला लागते आणि ही बाब चांगली नसल्याचे देखील नांगरे पाटील यांनी मत व्यक्त केले आहे