fbpx

ओडिसाचे मुख्यमंत्री पटनायक यांच्या बहिण गीता मेहतांनी नाकारला ‘पद्मश्री’

ओडिसा – ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यास नकार दर्शवला आहे. त्यांना साहीत्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती.

‘मला पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. मला हा पुरस्कार नाकारताना खूप दु:ख होतंय. कारण हा पुरस्कार अशावेळी दिला जातोय जेव्हा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. या पुरस्काराची वेळ योग्य नाही आहे. पुरस्कार न घेण्याची घोषणा करणे हे माझ्यासाठी तसेच सरकारसाठी लज्जास्पद आहे. याचे मला नेहमीच दु:ख राहील.’, असे गीता मेहता म्हणाल्या.

यावेळेस एकूण 112 पद्म पुरस्कार दिले गेले. यामध्ये 94 जणांना पद्मश्री, 14 जणांना पद्म भूषण आणि 4 जणांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कला, साहित्य, सामाजिक सेवा, विज्ञान, इंजीनियरींग, ट्रेड अॅण्ड इंडस्ट्री, चिकित्सा, साहित्य आणि शिक्षण,खेळ, नागरी सेवेत महत्त्वाचे योगदान येणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

2 Comments

Click here to post a comment