ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यातील स्थळांचे सौंदर्य पाहा नागराज मंजूळेंच्या कॅमेरातून…

nagraj manjule

औरंगाबाद : सैराट चित्रपटापासून प्रकाशझोतात आलेले नागराज मंजूळें सध्या शहरात शूटिंग लोकेशन पाहण्यात व्यस्त आहे. आगामी चित्रपटात शहरातील काहीं भागाचे चित्रीकरण मंजूळे करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी शहरालगत असलेल्या ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसराची पाहणी मंजूळे यांनी सोमवारी गोपनिय रित्या केली.

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा फटका चित्रपट सृष्टीला मोठ्याप्रमाणात बसला आहे. छोट्या पडद्या व्यतिरिक्त चित्रपटाचे चित्रीकरण फार कमी प्रमाणात झाले. महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात जिथे कमी संसर्ग आहे. अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. याच धर्तीवर अनेक निर्माते, दिग्दर्शक सध्या शहरात लोकेशन पाहत आहे.

आगामी चित्रपटात शहरातील विविध भाग मंजूळे चित्रीत करणार असून यात देवगिरी किल्ल्यावर चित्रपटातील मोठे सिन शुट करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र ते कोणता चित्रपट देवगिरी किल्ल्यावर चित्रीत करणार आहे, याची गोपनियता कटाक्षाने पाळली जात आहे. दरम्यान दौलताबाद येथील एका हॉटेलमध्ये चर्चा करतांनाचे छायाचित्र ‘महाराष्ट्र देशा’ च्या हाती लागले.

महत्वाच्या बातम्या :