fbpx

राज्यभरात राज ठाकरेंचा स्टॅंड अप कॉमेडीचे शो, स्वत:चा पक्ष संपला दुस-याला काय संपवणार – तावडे

raj thakare with vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पाठोपाठ नांदेडमध्ये जाहीर सभा घेत मोदींवर निशाणा साधला आहे, लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देता राज ठाकरे आघाडीसाठी सभा घेत असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे, यामध्ये आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांचे सध्या राज्यभरात स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत, मुंबईनंतर काल नांदेडमध्ये शो झाला. अशी टीका तावडे यांनी केली आहे. ज्यांच्या पक्षाचा एक खासदार – आमदार नाही, उरले सुरलेले नगरेसवक देखील पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे ते दुस-याला संपविण्याची भाषा कशी काय करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले नसले, तरी ते जाहीर सभांमधून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन करत आहेत, त्यामुळे ठाकरे यांच्या सभांचा खर्च त्या सभेच्या ठिकाणच्या आघाडीच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचं तावडे म्हणाले.