शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बहुतांश पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर आहे. विद्यार्थ्यांतडे दुर्लक्ष झाले आहे. आगामी काळात ती जबाबदारी प्रभारी मंडळ कशी पार पाडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात  शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या बदल्या झाल्या तर औरंगाबाद मध्ये नवीन अधिकारी येण्याएेवजी आहे त्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. उपशिक्षणाधिकारी २, गटशिक्षणाधिकारी ६, विस्तार अधिकाऱ्यांची २७, केंद्रप्रमुखांचे ९४ पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. आता ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधेची अडचण असल्याने या सर्व अडचणींवर मात करीत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.

तसेच शिक्षकांकडे इतर अनेक जबाबदाऱ्याही देण्यात आल्या होत्या. सर्व जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे. मात्र प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी नसल्याने शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे जिल्हा परिषद प्रशासन जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष दिले नाही तर ग्रामीण भागातील पाया मजबूत होण्यास अडचणी येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या