नीटची परीक्षा वर्षातून एकदाच

blank

टीम महाराष्ट्र देशा : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीटची परीक्षा, वर्षातून एकदाच घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास या संस्थेने आज दिली आहे. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार होती. मात्र आता ही परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे. तर जेईई ही परीक्षा ७ जुलैला घोषणा केल्या प्रमाणे वर्षातून दोनदा होणारा आहे. आणि विशेष म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन असेल.

त्याचबरोबर नीटची परीक्षा ऑनलाईन न घेता ती पेपर, पेन, पेन्सिल द्वारे होणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. यावर्षीची नीट ची परीक्षा ५ मे रोजी होईल. तर निकाल ५ जून रोजी मिळेल.

सुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री