शिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी

अमरावती : विद्यार्थ्यानी शिक्षकाना बेधडक प्रश्न विचारावेत, ही शिकवण देणे शिक्षणाचे काम. तावडे मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या पद्धतीचे प्रोडक्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला अटक करा अशी बेताल विधाने ते करत आहेत. त्यामुळे त्यांना ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट ‘ ही शिक्षा देण्याची वेळ आता आली आहे असे आपचे मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

अमरावती येथे विद्यार्थ्यांशी बोलताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना “आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?” असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको,नोकरी कर’, असे बेलगाम, निर्लज्ज उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. बरं इतकंच नाही, तर ज्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थाला त्यांनी रेकॉर्डींग डिलीट कर असं म्हटलं. पण त्यावर ‘या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या’ असे आदेशही विनोद तावडे यांनी दिले. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट केले.

Loading...

‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे गंभीर विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त मुलांची परीक्षा फी माफी केल्याचे , स्वतःची पाठ थोपटून घेणारे बंनेर भाजपा ने शहरात लावले होते . गेल्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण ही फक्त आर्थिक दृष्ट्या श्रीमंता चा हक्क झाला आहे . व्यावसायिक शिक्षण हे सामान्य नागरिकांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेर गेले आहे. एकीकडे विद्यापीठ खाजगीकरण , कंपनी शाळा , अवाजवी फी वाढ मान्य करणारे कायदे करत आणि दुसरीकडे शिक्षणासारख्या मुलभूत अधिकारांची गळचेपी करत तरुणांना ‘आरक्षणाच्या भ्रामक स्वप्नांमध्ये’ गुंतवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला.

वंचित आणि दुर्बल घटकांना ‘शिका आणि संघर्ष करा’ असे सांगणारे आंबेडकर, मोफत शिक्षणाची सोय देणारे शाहू , फुले दाम्पत्य , भाऊराव पाटील यांच्या महाराष्ट्रच्या माथी ‘शिकणे परवडत नसेल तर नोकरी करा ‘ असे सांगणारे मंत्री विनोद तावडे हे महाराष्ट्राचे कलंक आहेत . म्हणून आम आदमी पार्टी त्यांचा राजीनामा मागत आहे असे आपचे राज्य उपाध्यक्ष रंग राचुरे यांनी म्हटले आहे.

आज पीएचडी , बीएड मुले रस्त्यावर येवून आंदोलन करत आहेत तर हमालाच्या जागेसाठी लाखो पदवीधर अर्ज करीत आहेत. असें असताना या मुलांना आर्थिकदृष्ट्या झेपत नसेल तर त्यांनी कोणत्या नोकऱ्या कराव्यात हे सुद्धा मंत्री विनोद तावडे यांनी सांगावे अशी मागणी आप युवाचे अजिंक्य शिंदे यांनी केली आहे.

या वेळेसच्या आंदोलनात ”शिक्षण विनोदाच्या तावडीत आणि प्रश्न विचारणारा कोठडीत” ‘झेपत नाही,शिक्षण सोडा नव्हे, तावडे खुर्ची सोडा’ या घोषणा देण्यात आल्या .  आपचे रंगा राचुरे राज्य उपाध्यक्ष , मुकुंद किर्दत अध्यक्ष पुणे, अजिंक्य शिंदे ,संदीप सोनवणे, सावन राऊत, योगेश इंगळे, चेतन बेंद्रे, स्वप्नेष कुंजीर, श्रीकांत आचार्य , महेश स्वामी, अभिजीत मोरे, तुषार कासार , निखिल खळे, अजिंक्य पुटाने,मुजुमदार काका , दत्तात्रय कदम,प्रवीण भाहिर, संदीप घोडके, निखील खळे , महेश स्वामी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सामील झाले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'