मे महिन्यातील जेईई मुख्य परीक्षा स्थगित, शिक्षण मंत्र्यांची घोषणा

परीक्षा, कॉलेज, exam

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील अनेक महत्त्वांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. त्यातच आता मे महिन्यात होणारी संयुक्त प्रवेश परीक्षेची (जेईई-मुख्य) सेशन्स स्थगित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी आज ही माहिती दिली. या परीक्षांच्या पुढील तारखा लवकरच जाहीर होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला सातत्याने भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलेय.

जानेवारी महिन्यात जेईई मुख्य परीक्षा मे मध्ये होईल असे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी जाहीर केले होते. त्यासाठी २४, २५, २६, २७, २८ मे या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण सध्या कोरोनाची स्थिती पाहून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. यापूर्वी एप्रिलमध्ये २७, २८, आणि ३० तारखेला होणारे सेशन्सही कोविडच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत.

यंदाच्या वर्षी जेईई मेन ही परीक्षा चार टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २३ ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान या परिक्षेचा पहिला टप्पा पार पडला. तर दुसरा टप्पा १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत पार पडला. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २७, २८ आणि ३० एप्रिल २०२१ दरम्यान होणार होती. पण कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यातल्या परीक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे. २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती.

महत्वाच्या बातम्या