Shiv Sena । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. यानंतर शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ईडीने अटक केली आहे. यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक म्हणून काम बघत होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. शुक्रवारी सामनाच्या प्रिंटलाईनवर संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचं नाव छापून येत होतं. शुक्रवारी (५ ऑगस्ट) सामनाचे संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे सामनाची संपादकीय जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे.
दरम्यान, 90 च्या दशकात आपले विचार,राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये ‘सामना’ दैनिकाची सुरुवात केली होती. त्याच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करत २९ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांनी सामना संपादकपदाची धुरा पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली.
महत्वाच्या बातम्या :
- Congress। प्रियांका गांधींना पकडण्यासाठी पोलिसांचा घेराव
- CM Mamata Meets PM Modi : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- Amruta fadnavis | ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर अमृता फडणवीसांना कोण आठवलं?; पहा VIDEO
- Deepak Kesarkar । नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याने उद्धव ठाकरेंचं भाजपसोबत बोलणं रखडलं – दीपक केसरकर
- Nana Patole | भाजपचा देश विकून कारभार सुरु आहे – नाना पटोले
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<