पुणे : तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झालेले संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. येत्या मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पांडे यांना देण्यात आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय पांडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पांडे हे चार दिवसांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांना समन्स दिल्याने आता पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे.
चित्रा रामकृष्णन प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी पांडे यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पांडे पोलीस महासंचालक होते तेव्हा पांडे त्यांनी परमबीरसिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव आणला होता, असे सांगितले जात आहे.
राज्यात सत्ताबदल होत असताना पांडे हे देखील सेवानिवृत्त झाले. त्यामुळे निवृत्त संजय पांडे यांची चौकशी तातडीने सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आधिकारी म्हणून काम न करता आघाडी सरकारच्या बाजूने काम केल्याचा राज्यातील आरोप भाजप नेते आणि केंद्रातील मंत्र्यांनी केला होता.
संजय पांडे यांच्या काळात वाझे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात कोणतीही बाजू न घेता नियमाप्रमाणे काम न करता तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचविण्याचा प्रयत्न पांडे यांनी केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप पांडे यांच्यावर यापूर्वी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<