ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडू यांची सरकारवर टीका

ED should carry BJP flag Bachchu Kadu criticizes the government बच्चू कडू यांची सरकारवर टीका म्हणाले ED ने भाजपचा झेंडा Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडू यांची सरकारवर टीका

जळगाव : गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचे खासगी व शासकीय निवासस्थानी धाडी टाकल्या. ईडीने मुंबई, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 7 मालमत्तांवर 14 तास झडती घेतली. ईडीने त्यांच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. अनिल परब यांच्या संपत्तीत 8 वर्षांत 4 पट, तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 25 पट वाढ झाल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुवारी सकाळी 6.30 वाजता ईडीचा हा छापा सुरू झाला आणि रात्री 8.30 पर्यंत चालला. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांची कसून चौकशी केली. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात इतर राज्याच्या तुलनेत ED ने महाराष्ट्रात किती धाडी टाकल्या यांचा आकडा केंद्र सरकारने जाहीर करावा, असा टोला बच्चू कडू यांनी मोदी सरकारला लगावला आहे. ED केंद्र सरकारसाठी काम करते, असे देखील बच्चू कडू म्हणाले.

ईडीचे छापे सुडाचे राजकारण – शिवसेना

परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे म्हणजे सूडबुद्धीची कारवाई असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा कृतीमुळे भाजपविरोधात लढण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होईल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला, मात्र महाविकास आघाडी सरकार परब यांच्या पाठीशी उभे आहे.

परबांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी – किरीट सोमय्या

दापोली रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब यांनी आता तुरुंगात जाण्याची तयारी करावी, असे म्हटले आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी तुरुंगात जाण्यासाठी कापडी पिशवी तयार करावी.

महत्वाच्या बातम्या :

>>> TOP CATEGORIES - राजकारण क्रीडा बातम्याकृषी बातम्याआरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्यानोकरी बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्याऔरंगाबाद बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याव्हिडीओ बातम्याTrending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<