भुजबळ हेच महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार – सक्तवसुली संचालनालय

मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे तब्बल २ वर्ष तुरुंगात होते. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र भुजबळांसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. या संपूर्ण घोटाळ्याचे भुजबळ हेच सूत्रधार असल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.

सक्तवसुली संचालनालयाने नव्याने न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या आरोप पत्रात म्हंटलं आहे की, महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात राज्य शासनाचे ८४० कोटींचे नुकसान झाले. त्यास भुजबळ हेच जबाबदार आहेत. २९१ कोटींच्या मालमत्तेचा आतापर्यंत संचालनालयाला शोध घेता आला आहे.

bagdure

२००७ ते २०१० या काळात १२३ कोटी रुपये सुरेश जाजोदिया, चंद्रशेखर सारडा, प्रवीण जैन आणि संजीव जैन यांच्यामार्फत विविध कंपन्यांत गुंतवून त्या मोबदल्यात समभाग घेतल्याचेही दाखविण्यात आले असले तरी हे बनावट व्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परवेझ कन्स्ट्रक्शन या कंपनीला ७० कोटी रुपये १९ कंपन्यांकडून मिळाले आहेत तर आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीला १८ कंपन्यांकडून ५१ कोटी मिळाले आहेत. या नोंदीही बनावट असल्याचा आरोप आहे. उपलब्ध कागदपत्रावरून काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेत छगन व समीर भुजबळ यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचं सक्तवसुली संचालनालयाने म्हंटलं आहे.

You might also like
Comments
Loading...