अनिल परबांना ईडीची नोटीस; देवेंद्र फडणवीस म्हणाले …

अनिल परबांना ईडीची नोटीस; देवेंद्र फडणवीस म्हणाले …

anil parab

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. याचे कारण आता परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

याच नोटिशीबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अनिल परब यांना नोटीस मिळाली आहे की नाही, याची कल्पना नाही. ईडी किंवा सीबीआय हे सर्व त्यांच्या परीने काम करतात, असं फडणवीस म्हणाले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करून अनिल परबांवर निशाना साधला आहे. ईडीने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र ‘घ्या रे त्याला आत’ मात्र प्रेमाने ऐसा कैसा चलेगा अनिल?’ असा सवाल त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या